|Sunday, February 23, 2020
You are here: Home » leadingnews » भारताची पाणबुडी आमच्या हद्दीत , पाकचा पोकळ दावा

भारताची पाणबुडी आमच्या हद्दीत , पाकचा पोकळ दावा 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान रोज नवनवे दावे करत आहे. मंगळवारी पाकिस्तानच्या नौदलाने दावा केला की एका भारतीय पाणबुडीने त्यांच्या जलक्षेत्रात घुसखोरी करण्याच्या प्रयत्न केला. हा प्रयत्न पाकिस्तानने म्हणे हाणून पाडला.

 

पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान रोज नवनवे दावे करत आहे. मंगळवारी पाकिस्तानच्या नौदलाने दावा केला की एका भारतीय पाणबुडीने त्यांच्या जलक्षेत्रात घुसखोरी करण्याच्या प्रयत्न केला. हा प्रयत्न पाकिस्तानने म्हणे हाणून पाडला. या दाव्यासोबत पाकने मीडियाला एक फुटेजही दिले. हा दावा आणि फुटेजही फुसका बार आहे. भारतीय संरक्षण तज्ञांच्या मते हा दावा पोकळ आहे. पाकिस्तानला असे करण्याचा कोणताही अधिकार नाही.

 

संरक्षण विश्लेषकांचे म्हणणे आहे की पाकिस्तान ज्या ठिकाणाचा व्हिडिओ जारी करून हा दावा करत आहे, तो फसवा आहे. ज्या क्षेत्राला पाकिस्तान आपली सीमा म्हणत आहे, तो भाग आंतरराष्ट्रीय सीमा क्षेत्रात येतो. आंतरराष्ट्रीय सीमा क्षेत्र असल्याने तेथे पाकिस्तानला भारतीय पाणबुडी ताब्यात घेण्याचा वा सोडण्याचा अधिकार नाही. ’पाकिस्तानच्या शांततेच्या धोरणाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने या पाणबुडीला लक्ष्य केले नाही,’ असाही पाकिस्तानचा दावा आहे. शिवाय भारताने 2016 नंतर दुसऱयांदा पाकिस्तानच्या जलक्षेत्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याचेही पाकचे म्हणणे आहे.

 

 

 

Related posts: