|Monday, January 20, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » जिल्हा बँकेने शेतकऱयांचे हित जोपासले

जिल्हा बँकेने शेतकऱयांचे हित जोपासले 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मेटगुताड (ता. महाबळेश्वर) शाखेचे स्थलांतर व उपविभागीय कार्यालयाचा  नवीन  सुसज्ज इमारतीचे उद्घाटन कार्यक्रम आमदार मकरंद पाटील यांच्या शुभहस्ते नुकताच पार पडला.  

यावेळी आमदार मकरंद पाटील म्हणाले, यशवंतराव चव्हाण व किसनवीर आबा यांनी सातारा जिह्याला नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राला सहकाराची दिशा दिली आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने शेतकऱयांचे हित आणि गरज ओळखून अधिकाधिक सामान्य ग्राहकांपर्यंत बँकिंग सुविधा मिळाव्यात याकरिता शहरी व ग्रामीण भागात शाखा कार्यान्वित केल्या आहेत. स्ट्रॉबेरी पिकासाठी शून्य टक्के व्याजदराने कर्ज पुरवठा करणारी राज्यातील एकमेव सातारा जिल्हा बँक असून महाबळेश्वर तालुक्याचे आर्थिक जीवनमान उंचावणेस स्ट्रॉबेरी पिकाचा मोठा वाटा आहे.

 जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपूरे म्हणाले, जिल्हा बँक शेतकऱयांच्या आर्थिक उन्नतीसाठी कटिबद्ध असून स्ट्रॉबेरी कर्जाची मर्यादा वाढवून शेतकऱयांना आणखी समृद्ध केले आहे. महाबळेश्वरमध्ये बँकेचे विभागीय कार्यालय झाल्याने बँकिंग कामकाज सुकर होणार आहे.

बाळासाहेब भिलारे म्हणाले, भिलारमध्ये इतर राष्ट्रीयकृत तसेच खाजगी बँकाच्या तुलनेत जिल्हा बँक अग्रेसर असून तळागाळातील सर्व सामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचली असल्याचे सांगितले. 

सूत्रसंचालन बँकेचे व्यवस्थापक सुजित शेख यांनी केले. कार्यक्रमास बँकेचे संचालक नितीनकाका पाटील, दत्तानाना ढमाळ, डी. एम. बावळेकर, जिल्हा परिषद सदस्या नीता आखाडे, पंचायत समिती सभापती रुपाली राजपुरे, सरपंच रंजना बावळेकर, उपसरपंच नितीन बावळेकर, बँकेचे सरव्यवस्थापक एम. व्ही. जाधव, राजेंद्र गाढवे, व्यवस्थापक राजेंद्र भिलारे, तसेच बँकेचे अधिकारी, कर्मचारी परिसरातील ग्राहक, शेतकरी, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

Related posts: