|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » उद्योग » घर कर्जावरील व्याजदरात एप्रिलमध्ये घट शक्य

घर कर्जावरील व्याजदरात एप्रिलमध्ये घट शक्य 

आरबीआयकडून दिलेल्या सुचनाचे बँकाकडून पालन

नवी दिल्ली

 भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) यांच्याकडून मागील बैठकीत व्याजदर कपात करण्यात बाबत घोषणा करण्यात आली होती. आणि त्याच बरोबर खासगीसह सरकारी बँकांना आपले कर्जावरील व्याजदर कमी प्रमाणात ठेवण्याच्या सुचना ही दिल्या होत्या. त्यानंतर काही बँका यावर राजी झाल्या तर काही बँका झाल्या नाहीत. त्यामुळे त्यावर आरबीआयने पुन्हा त्यानां याबाबत सुचना केल्या होत्या. त्याचाच परिणाम म्हणून येणाऱया एप्रिलमध्ये बँका आपल्या कर्ज देण्याच्या व्याजदरात घट करण्याचा अंदाज असून त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना घर कर्ज घेताना होणार असल्याचे म्हटले आहे.

सध्याच्या दरापैकी बँका आपल्या व्याजदरात 5 ते 10 इतक्या प्रमाणात कपात करण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मागच्या वेळी आरबीआच्या रेपो दरात 0.25 टक्कयांनी घटवण्यात आले होते. त्यापाठोपाठ स्टेट बँक लगेच आपले व्याज दर कमी केले होते. त्यानंतर खासगीसह अन्य सरकारी बँकानी आपल्या व्याजदरात घट करण्यासाठीची घोषणा आरबीआयने बँकांना करुन दिली आणि त्याचा फायदा ग्राहकांपर्यत पोहोचवण्यासाठी बँकांनी आपल्या आपल्या पातळीवर प्रयत्न करण्याबाबतही आरबीआयने सांगितले होते.

व्याजदर कपात

काही बँकांनी एमसीएलआरमध्ये व्याजदरात कपात केली आहे. परंतु काही सरकारी व खासगी बँका 5 ते 10 बेसिक पाँईट्समध्येच कपात करण्यची शक्यता आहे. व सार्वजनिक क्षेत्रात कार्यरत असणाऱया कमीत कमी चार बँका आणि एक खासगी बँक या महिन्यातच आपल्या व्याजदरात कपातीची घोषणा करणार असल्याची माहिती यादरम्यान सादर करण्यात आली आहे.

घर कर्जावरील व्याजदर

एमसीएलआर मूलभूत व्याजदर आणि बँकाजवळ असणारी शिल्लक रक्कम यावर आधारीत घर कर्जावर दिल्या जाणाऱया व्याजदराचा आकडा निश्चित केला जातो. त्यात बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, बँक ऑफ बरोडा या बँका आपले एमसीएलआर दर घटविण्यासाठी विचार करत आहेत.

Related posts: