|Sunday, July 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सुनिल कारंजकर यांच्या पुस्तकांचे प्रकाशन

सुनिल कारंजकर यांच्या पुस्तकांचे प्रकाशन 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

पुस्तके लिहणे हे जबाबदारीचे काम आहे. ते अगदी सहजरीत्या कारंजकर यांनी पेलले आहे. असे प्रतिपादन नाटय़ समिक्षक डॉ. श्रीकांत पाटील यांनी केले.

सुनील कारंजकर यांच्या दप्तर, शंभर नंबरी सोने, जलोम आणि परिवर्तन या चार पुस्तकांच्या प्रकाशनाप्रसंगी समिक्षक डॉ. श्रीकांत पाटील बोतल होते. श्रीमानयोगीनगर येथे हा कार्यक्रम पार पडला. तुकाराम सुदर्शनी अध्यक्षस्थानी होते.

यावेळी यशोधरा थिएटर ऍकॅडमीचे लक्ष्मण द्रविड म्हणाले, कारंजकर यांच्या चारही पुस्तकातून त्यांच्या नाटकाची अनुभूती वृत्ती आणि भावना वृद्धींगत केली आहे. प्रास्ताविक सुनील कारंजकर यांनी केले. सुत्रसंचालन अलका कारंजकर यांनी केले. दशरथ कांबळे यांनी आभार मानले. यावेळी तुकाराम सुर्यवंशी, एम. जी. चिखलीकर, बाबुराव कांबळे. शिवाजी सुदर्शनी, विजय दिवाण आदी उपस्थित होते.