|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » हंदवाडात एका दहशतवाद्याचा खात्मा

हंदवाडात एका दहशतवाद्याचा खात्मा 

श्रीनगर / वृत्तसंस्था :

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा जिल्हय़ात सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात गुरुवारी चकमक झाली. या चकमकीवेळी सुरक्षा दलांनी दिलेल्या प्रत्युत्तरात एक दहशतवादी मारला गेला आहे. हंदवाडा येथील क्रालगुंड भागात बुधवारी रात्री उशिरा दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाल्यावर शोधमोहीम राबविण्यात आली. सुरक्षा दलांना पाहता दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबारास प्रारंभ केला होता.

चकमक अद्याप सुरूच असल्याने सुरक्षा दलांनी परिसराला घेराव घातला असून शोधमोहीम कायम ठेवण्यात आली आहे. अजून एक दहशतवादी परिसरात लपून बसल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यापूर्वी हंदवाडा येथेच सुरक्षा दल आणि दहशतवादी यांच्यात 3 दिवसांपर्यंत चकमक चालली होती. या चकमकीत 2 दहशतवादी मारले गेले होते. परंतु चकमकीदरम्यान 5 जणांना हौतात्म्य पत्करावे लागले होते. तसेच चकमकीत एका नागरिकाला जीव गमवावा लागला होता.

सुरक्षा दलांनी मंगळवारी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. याचबरोबर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांचे घर उडवून दिले होते. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या खात्म्याकरता सुरक्षा दलांकडून मोहीम राबविण्यात येत आहे.

 

 

Related posts: