|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » मनोरंजन » कोकणातला शिमगोत्सव

कोकणातला शिमगोत्सव 

काही दिवसांपूर्वीच निलेश कृष्णाजीराव पालांडे ऊर्फ नीलेश कृष्णा लिखित, दिग्दर्शित शिमगा या चित्रपटाचा टिझर रिलीज झाला. ते पाहून या चित्रपटात काय पाहायला मिळणार याची उत्सुकता वाढली असतानाच, आता या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर सादर करण्यात आला आहे. कोकणची शान असलेला आणि ज्या सणाची कोकणासह महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस आवर्जून वाट पाहत असतो तो शिमगोत्सव या चित्रपटात अनुभवता येणार आहे. चित्रपटात कोकणातील शिमगोत्सवादरम्यान असलेले जोशमय वातावरण, गावागावात मानपानावरून होणारे वाद, अंतर्गत राजकारण पाहायला मिळणार आहे. आक्रमकता, द्वेष, अहंकार, जाळपोळ हे अनुभवत असतानाच हळुवार फुलत जाणारी प्रेमकथाही पाहायला मिळेल. एकमेकांबद्दल असलेले मनातील आकस, हेवेदावे अग्नीच्या ज्वाळांमध्ये जळून राख होऊन, नव्या सकारात्मक विचारांनी आयुष्याची सुरुवात व्हावी, यासाठी शिमगा सण उत्साहाने साजरा करण्याची परंपरा आहे. नकारात्मक वफत्तीचा नाश करून, प्रत्येक सण, उत्सव एक परंपरा म्हणून सर्वांनी मिळून एकत्र साजरा करावा, असा साधा, सरळ संदेश यातून दिला आहे. 

भूषण प्रधानने चित्रपटात रांगडी भूमिका साकारली आहे. तर मानसी पंडय़ाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसफष्टीला एक नवीन चेहरा मिळाला आहे. या व्यतिरिक्त राजेश शफंगारपुरे, कमलेश सावंत, सुकन्या सुर्वे, विजय आंदळकर यांच्याही या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. शिमगा 15 मार्च रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.

Related posts: