|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » खाणीसंदर्भात अहवाल सादर करा

खाणीसंदर्भात अहवाल सादर करा 

प्रतिनिधी/ पणजी

भारतीय मजदूर संघ गोवा विभागाचे सरचिटणीस कृष्णा पळ यांनी राज्यातील खाणी सुरू करण्याची विनंती करणारे पत्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठविले होते. त्याची गांभीर्याने दखल पंतप्रधानांनी घेतली असून राज्याच्या मुख्य सचिवांना प्रधानमंत्री कार्यालयातून आलेल्या पत्राद्वारे पंतप्रधानांनी आपल्याला खाणीसंदर्भात अहवाल सादर करा, असे सांगितले आहे.

कृष्णा पळ यांनी 4 फेब्रवारी 2019 रोजी पंतप्रधानांना पत्र पाठवून राज्यातील बंद पडलेल्या खाणी सुरू करण्यासाठी गोव्यातील तिन्ही खासदारांना वारंवार भेटून विनंती केली होती. प्रत्यक्षात त्यावर तोडगा निघालेला नाही. त्यामुळे थेट 60 हजार जणांचा रोजगार गेला आहे. आपण स्वतः यात लक्ष घालून खाणी पुन्हा सुरू व्हाव्यात यासाठी प्रयत्न करावे, अशी विनंती केली होती.

त्यावर पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या कार्यालयातून जितेंद्रकुमार मंडल यांच्या विभागीय अधिकाऱयांचे पत्र राज्याचे मुख्य सचिव यांच्या नावे 14 फेब्रुवारी 2019 ला आले आहे. त्यात त्यांनी कृष्णा पळ यांना यासंदर्भात उत्तर द्यावे आणि त्याची प्रत पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवावी, असे आदेश दिले आहेत.

     

Related posts: