|Sunday, August 25, 2019
You are here: Home » Top News » World Wide Web’ला ३० वर्षे पूर्ण, गुगलचं खास डुडल

World Wide Web’ला ३० वर्षे पूर्ण, गुगलचं खास डुडल 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली 

www अर्थात world wide web ला आज ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. कोणत्याही वेबसाइटच्या आधी डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू (www) टाकावे लागते. त्याशिवाय वेबसाइट आकार घेत नाही, अशा या ट्रिपल डब्ल्यूच्या ३० वर्षानिमित्त गुगलनं खास डुडल बनवलं आहे. एक आगळेवेगळे डुडल बनवून गुगलने www ला सलाम केला आहे. 

कोणत्याही वेबसाइटच्या आधी world wide web (www) दिसल्यानंतरच वेगवेगळे रिसोर्सेस आणि डॉक्यूमेंट्सचे ग्रुप असते. ज्यात एकत्र जोडून वेबसाइट बनवली जाते. याचा शोध वैज्ञानिक टीम बर्नर ली यांना जाते. गुगलने डुडल बनवताना टीम बर्नर ली यांच्या योगदानाचीही आठवण केली. जगाला इंटरनेटची भेट देणारे टीम बर्नर ली यांचा इंग्लंडमध्ये जन्म झाला. क्विंस कॉलेज आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठात त्यांनी १९७६ साली फिजिक्समध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी १९८९ साली सर्वात आधी इंटरनेट आणि वर्ल्ड वाइड वेब तयार केले.