|Thursday, February 27, 2020
You are here: Home » Top News » पार्थ पवार यांची उमेदवारी अद्याप निश्चित नाही : अजित पवार

पार्थ पवार यांची उमेदवारी अद्याप निश्चित नाही : अजित पवार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांची मावळमधून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात असतानाच अजित पवारांनी त्या मुद्यावर सूचक विधान केले आहे. अजित पवार यांनी बुधवारी (13 मार्च) मावळ लोकसभा मतदार संघाच्या प्रचारासाठी पनवेलमध्ये हजेरी लावली. पार्थ पवार यांची उमेदवारी अद्याप निश्चित नाही. अंतिम यादी जाहीर झाल्यावर पार्थचे नाव जाहीर होईल असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

    पार्थच्या प्रचारासाठी पनवेलमध्ये आलेलो नाही. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 48 जागा निवडून याव्या यासाठी आलो आहे असं अजित पवार यांनी म्हटले. तसेच ’जास्तीत जास्त समविचारी लोकांना एकत्र घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. आतापर्यंत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी कामगार पक्ष हे तीन पक्ष शंभर टक्के एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जातात हे सत्य आहे. आता बाकीच्या बद्दलची चर्चा सुरू असून एक-दोन दिवसांत हे चित्र स्पष्ट होईल’ असे अजित पवार यांनी म्हटले आहे.

 

Related posts: