|Monday, September 16, 2019
You are here: Home » उद्योग » फेसबुकचे क्रिस कॉक्स, व्हॉट्सऍपचे क्रिस डेनियल्स यांचा राजीनामा

फेसबुकचे क्रिस कॉक्स, व्हॉट्सऍपचे क्रिस डेनियल्स यांचा राजीनामा 

कॉक्स 14 वर्षांपासून कार्यरत : डेनियल्स व्हॉट्सऍपचे उपाध्यक्षपद सांभाळत होते. 

वृत्तसंस्था/ कॅलिफोर्निया

सध्या सामाजिक माध्यमांचा वापर दिवसेंदिवस वाढतच आहे. आणि त्याच  कंपन्या आपली ऑनलाईन सेवा देण्यासाठी नियमीत नवनवीन प्रयत्न करीत असतात. त्यातीलच एक प्रसिद्ध सोशल मिडीयात कार्यरत असणारी कंपनी म्हणजे  फेसबुक होय. फेसबुकमध्ये मागील 14 वर्षांपासून मुख्य प्रॉडक्ट ऑफिसर क्रिस कॉक्स यांनी राजीनामा दिलेला आहे. परंतु त्यांनी जरी राजीनामा दिला असला तरी ते कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांचे सर्वात जवळच्या अधिकाऱयांपैकी एक होते. ते सर्वात जवळचे व विश्वासू सहकारी म्हणून ही ओळखले जायचे.

कॉक्स जबाबदारी

कंपनीचे सर्वप्रकारचे ऍप्सची देखभाल व फेसबुकवरील न्यूज फिडींगचे काम कॉक्स हे करत होते, तर ते कंपनीच्या सुरुवातीपासून 15 इंजीनिअरपैकी एक आहेत. तर त्यांनी दिलेल्या अचानक राजीनाम्याचे कारण अस्पष्ट असल्याचेही झुकरबर्ग यांनी यावेळी सांगितले आहे.

डेनियल्स यांचा राजीनामा

डेनियल्स  मागील वर्षात  व्हॉट्सऍपचे प्रमुख्य पदावर कार्यरत होते. या अगोदर त्यांनी फेसबुकच्या बिझनेस डेव्हलपमेन्टचे मुख्य म्हणून कारभार सांभाळला आहे.

11 महिन्यात महत्वाच्या पदावरील 6 व्यक्तीचा राजीनामा

मागील एप्रिल महिन्यात व्हॉट्सऍपचे सीईओ आणि सहसंस्थापक जॉन कॉम यांनी राजीनामा दिला होता. त्यापाठोपाठ ऑगस्टमध्ये फेसबुकचे मुख्य सुरक्षा अधिकारी एलेक्स स्टेमॉस यांनी कंपनी सोडली. तर डिसेंबरमध्ये इंस्ट्राग्रामचे सहसंस्थापक केविन सिस्ट्रॉम आणि माइक क्रीगर यांनी आपला राजीनामा दिला होता. सध्या क्रिस कॉक्स आणि क्रिस डेनियल्सही फेसबुकपासून वेगळे झाले आहेत.