|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » उद्योग » ‘ट्रबोस्टील’कडून एलपीएस टीएमटी बारचे लाँचिंग

‘ट्रबोस्टील’कडून एलपीएस टीएमटी बारचे लाँचिंग 

वृत्तसंस्था/ बेंगळूर

ट्रबोबार्स स्टील एलपीएस टीएमटी बार यांच्याकडून प्रथमच लॉ फॉस्फरस आणि सल्फर (एलपीएस) या तंत्रज्ञानाचा वापर करुन अतिउच्च दर्जाचे स्टीलचे बेंगळूर येथे प्रिसिद्ध अभिनेते दिगदर्शक रमेश अरविंद यांच्या हस्ते सादरीकरण करण्यात आले आहे. स्टील निर्मितीच्या क्षेत्रात प्रसिद्ध असणाऱया बँण्डमध्ये ट्रबोबार्सस्टील हा एक असून यांच्या आधारे बांधकाम क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी कंपनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन नवीन स्टीलचे उत्पादन करण्यासाठी प्रयत्न  आगामी काळात करण्यात येणार असल्याचा विश्वास यावेळी कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रवीण चंद्रा आणि स्पॉणगे आर्यन ऍण्ड पॉवर प्रा.लि. यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे.

कंपनीचे 100 वितरण एजन्ट कर्नाटकात सध्या कार्यरत असून लवकरच अन्य राज्यात नवीन योजना तयार करुन विस्तारासह कंपनी आपले उत्पादन वाढविण्यावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे.