|Saturday, October 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » अपघातात मृत अपूर्वा प्रभू सिंधुदुर्गातील रहिवासी

अपघातात मृत अपूर्वा प्रभू सिंधुदुर्गातील रहिवासी 

प्रतिनिधी / वेंगुर्ले:

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे गुरुवारी सायंकाळी पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या अपूर्वा अभय प्रभू (35) या सिंधुदुर्गातील वेंगुर्ले तालुक्यातील नवाबाग येथील मूळ रहिवासी आहेत. त्यांचे पूर्ण कुटुंब मुंबईत डोंबिवली येथे वास्तवास आहे. अपूर्वा या जे. जे. हॉस्पिटल येथे पारिचारिका म्हणून काम करीत होत्या. अपूर्वा यांचे माहेर देवगड तालुक्यातील विजयदुर्ग-जुनी बाजारपेठ येथील असून त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव ममता विठ्ठल कोयंडे असे आहे. कोयंडे कुटुंबही गेली अनेक वर्षे मुंबईतच स्थायिक आहे. मुंबईतील दुर्घटनेमध्ये अपूर्वाच्या मृत्यूची बातमी समजताच नवाबाग, विजयदुर्ग परिसरात शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात पती, मुलगा, मुलगी परिवार आहे.