|Sunday, September 22, 2019
You are here: Home » leadingnews » इस्रायलने गाझावर केला एअर स्ट्राइक, 100 ठिकाणी टाकल्या मिसाइल

इस्रायलने गाझावर केला एअर स्ट्राइक, 100 ठिकाणी टाकल्या मिसाइल 

ऑनलाईन टीम / जेरुसलेम :

 इस्रायलच्या सैन्यानं गाझामध्ये 100 ठिकाणांवर एअर स्ट्राइक केले आहे. इस्रायलने  ही कारवाई राजधानी तेल अविववर झालेल्या 4 रॉकेट हल्ल्यानंतर केली आहे. त्यातील 3 रॉकेट इस्रायलच्या रॉकेट डिफेन्स सिस्टीमने   निष्क्रिय केले. मिळालेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या विमानांनी हमासच्या सुरक्षा चौक्यांवर मिसाइल डागल्या असून, इस्रायलनेच याची माहिती सार्वजनिक केली आहे. इस्रायलच्या दाव्यानुसार, त्यांनी हमासच्या 100 लष्करी तळांना टार्गेट केले आहे. हे एअर स्ट्राइक दक्षिणी गाझाच्या खान युनिस भागात करण्यात आले आहे.

हे ठिकाण गाझाच्या राजधानीपासून 25 किलोमीटर अंतरावर दक्षिणेकडे आहे. इस्रायलची राजधानी तेल अविववर 2014नंतर पहिल्यांदाच रॉकेटने  हल्ला करण्यात आला. 9 एप्रिलला इस्रायलमध्ये निवडणुका आहेत, त्याच पार्श्वभूमीवर इस्रायल सेनेने  ही कारवाई केली आहे. तत्पूर्वी भारतानेही 26 फेब्रुवारीला पाकिस्तानमधल्या बालाकोटमध्ये घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते.