|Saturday, January 25, 2020
You are here: Home » leadingnews » दाऊद, सलाउद्दीनला हवाली करा , भारताचा पाकपुढे प्रस्ताव

दाऊद, सलाउद्दीनला हवाली करा , भारताचा पाकपुढे प्रस्ताव 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

सातत्याने चर्चेचे प्रस्ताव पाठवण्याची नौटंकी करणाऱया पाकिस्तानला भारताने चांगलेच खडेबोल सुनावले असून पाकिस्तान दहशतवाद संपवण्याबाबत गंभीर असल्यास त्यांनी निदान दाऊद इब्राहिम, हिजबुल मुजाहिदीनचा म्होरक्मया सय्यद सलाउद्दीन यासारख्या भारतीय नागरिक असलेल्या आणि पाकमध्ये आश्रयाला असलेल्या दहशतवाद्यांना भारताच्या हवाली करायला हवे, अशी मागणीच भारताने पाककडे केली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

 

 पुलवामा हल्ल्यानंतर या हल्ल्याची जबाबदारी घेणाऱया जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेवर पाककडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. भारताने पुरावे देऊनही पाककडून केवळ दिखाऊपणा सुरू आहे. त्यावरच बोट ठेवत भारताने पाकला खडेबोल सुनावले आहेत. दहशतवादाबाबत पाक खरंच गंभीर असल्यास ते त्यांनी प्रत्यक्ष कृतीतूनही दाखवायला हवे. दाऊद, सलाऊद्दीन व आणखीही काही भारतीय नागरिक असलेले दहशतवादी पाकमध्ये वास्तव्याला असून त्यांना तत्काळ भारताच्या हवाली करायला हवे, असे भारताच्या वतीने पाकला सांगण्यात आले आहे.

 

Related posts: