|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ऍड. संजय गांगनाईक लोकसभा लढविणार

ऍड. संजय गांगनाईक लोकसभा लढविणार 

कणकवली:

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतददारसंघातून आपण निवडणूक लढविणार असल्याची माहिती राष्ट्रीय जनता दलाचे जनरल सेक्रेटरी ऍड. संजय गांगनाईक यांनी दिली आहे. कोकणी जनतेच्या हितासाठी, लोकशाही टिकविण्यासाठी आपण जनता दल आघाडीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवित असल्याचेही गांगनाईक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे.

जनता दलाच्या काळात कोकणातील जनता समाधानी होती. अभ्यासू नेते कार्यरत होते. परिणामी कोकण रेल्वेसारखे महत्वाकांक्षी प्रकल्प झाले. या उलट विद्यमान सरकारच्या कार्यकाळात रस्त्यांसह अनेक समस्या तशाच राहिल्या.  विद्यमान सरकारला 100 दिवस पूर्ण होताच आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे कोकण रेल्वेच्या दुहेरीकरणाच्या मागणीची दखल घेण्यास भाग पाडले होते.  ‘पैशांतून सत्ता व सत्तेतून पैसा’ हे समिकरण आता बदलायला हवे. राजकारण हा श्रीमंतांचा खेळ झाल्याची भावना जनसामान्यांमध्ये झाली आहे. ही भावना जनसामान्यांमधून नाहिशी करण्यासाठी आपण निवडणूक मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याचेही ऍड. गांगनाईक यांनी म्हटले आहे.