|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » Top News » म्हाडाच्या घरांची सोडत पुढे ढकलली, नव्या तारखेची लवकरच घोषणा होणार

म्हाडाच्या घरांची सोडत पुढे ढकलली, नव्या तारखेची लवकरच घोषणा होणार 

ऑनलाईन टीम /  मुंबई :

 मुंबईत हक्काच्या घरासाठी म्हाडाच्या सोडतीची वाट पाहणाऱ्यांना अजून काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कारण लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर म्हाडा प्राधिकरणाने घरांची सोडत पुढे ढकलली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतरच सोडत जाहीर होईल.

म्हडाने मुंबईतील 217 घरांसाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध केली होती. या घरांसाठीची सोडत 21 एप्रिल रोजी जाहीर होणार होती. परंतु लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही सोडत पुढे ढकलण्यात आली आहे. आता घराच्या प्रतीक्षेत असलेल्यांना 23 मे म्हणेजच निवडणूक निकालानंतरच दिलासा मिळणार आहे.

Related posts: