|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » Top News » छातीवर शिवराय अन् पाठीवर शंभूराजे कोरणाऱया तरूणाईच्या प्रतिनिधीला उमेदवारी – अमोल कोल्हे

छातीवर शिवराय अन् पाठीवर शंभूराजे कोरणाऱया तरूणाईच्या प्रतिनिधीला उमेदवारी – अमोल कोल्हे 

ऑनलाईन टीम / पुणे :

जातीपातीच्या पलिकडे जाऊन छातीवर शिवराय आणि पाठीवर शंभूराजे कोरणाऱया तरुणाईच्या प्रतिनिधीला पवार साहेंबांनी उमेदवारी दिली अशा शब्दात राष्ट्रवादीचे शिरुरचे लोकसभेचे उमेदवार अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांचे आभार मानले.

कोल्हे म्हणाले, 2019 ची ही परिवर्तनासाठी आहे. अनेकांनी माझ्या उमेदवारीवर प्रश्न उपस्थित केले. मी पवारांचे आभार मानतो की त्यांनी एक सुशिक्षीत शेतकरी कुटुंबातील तरुणाला उमेदवारी दिली. तसेच त्यांनी कै. भागोजी सभाजी कोल्हे या बैलगाडा मालकाच्या नातवाला उमेदवारी दिली याबद्दलही त्यांचे आभार. ही उमेदवारी म्हणजे जी तरुणाई जातीपातीच्या पलिकेड जाऊन छातीवर शिवराय आणि पाठीवर शंभूराजे कोरते आणि जीवाचं नाव भंडारा ठेवते उधळला तरी येळकोट आणि नाही उधळला तरी येळकोट अशा तरुणाईच्या प्रतिनिधीला दिलेली उमेदवारी आहे. 2014 आणि 2019 च्या फरक सांगताना कोल्हे म्हणाले, 2014 च्या निवडणूकीच्या वेळी ही निवडणूक संसदीय नाही तर अध्यक्षीय निवडणूक पद्धतीने लढवली जात असल्याचा भ्रम नागरिकांना मध्ये निर्माण करण्यात आला होता. परंतु गेल्या पाच वर्षात लोकांच्या लक्षात आले की आपली निवडणूक ही संसदीय निवडणूक आहे त्यामुळे आपण योग्य खासदार निवडायला हवा. याबाबातचा किस्सा कोल्हेंनी सांगितला. पाणीपतला रेल्वेतून जात असताना एका सरदारजीने मोदींचा वृत्तपत्रातील फोटो पाहून पेपर ठेवून दिला. त्यावेळी कोल्हे यांनी काय झाले असे विचारले असता. ते म्हणाले 2014 ला चूक केली. आम्ही पंतप्रधान निवडतोय असे समजून मतदान केले. परंतु आपली लोकशाही संसदीय आहे त्यामुळे आता योग्य खासदार निवडणार.

 

Related posts: