|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » मनोरंजन » श्रावणी देवधर यांचा कौटुंबिक समस्यांत गुंफलेला ‘मोगरा फुलला’

श्रावणी देवधर यांचा कौटुंबिक समस्यांत गुंफलेला ‘मोगरा फुलला’ 

दिग्दर्शिका श्रावणी देवधर या बऱयाच वर्षांनी ‘मोगरा फुलला’च्या माध्यमातून दिग्दर्शनाकडे परत वळल्या आहेत. त्यांनी याआधी अनेक गाजलेले चित्रपट दिग्दर्शित केले होते. त्यामध्ये लपंडाव, सरकारनामा, लेकरू या मराठी चित्रपटांचा समावेश आहे. मोगरा फुललाला स्वत:चा असा वेगळा टच देण्यास त्या आता सज्ज झाल्या आहेत.

ही आगळय़ा पद्धतीने गुंफलेली अशी प्रेमकथा आहे. कौटुंबिक समस्यांमध्ये गुंतलेल्या एका मुलाभोवती ही कथा फिरते. त्याच्या या समस्यांमुळे त्याच्या लक्षातही येत नाही की, आपले लग्नाचे वय उलटून गेले आहे. एके दिवशी तो अत्यंत खंबीर आणि स्वतंत्र विचाराच्या मुलीच्या प्रेमात पडतो. ती एका वेगळय़ा वातावरणात वाढलेली मुलगी आहे. त्याच्याही लक्षात जेव्हा प्रेमाची ही बाब येते तेव्हा ही प्रेमकथा खूप पुढे सरकलेली असते, असे श्रावणी देवधर सांगतात. स्वप्नील जोशीची मुख्य भूमिका असलेला ‘मोगरा फुलला’ 14 जूनला प्रदर्शित होणार आहे.

   

Related posts: