|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » टेम्पो पळविल्याप्रकरणी पोलिसांकडून जबाब

टेम्पो पळविल्याप्रकरणी पोलिसांकडून जबाब 

कणकवली:

जानवली-कृष्णनगरीनजीक झालेल्या हाणामारीनंतर आयशर टेम्पो घेऊन पसार झालेला टेम्पो पेंडुर परिसरात सोडून पळालेला तो क्लिनर व टेम्पोचा मालक रविवारी कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाला. क्लिनरनेही आपली व चालकाची पैशांवरून मारामारी झाल्याचे कबूल केले. तर टेम्पोमधील ‘वेस्ट कॉटन’ची गोवा ते मुंबई अशी वाहतूक सुरू होती. मुंबई येथे ‘वेस्ट कॉटन’वर प्रक्रिया केली जाते, अशी माहिती टेम्पो मालकाने दिली. याबाबत दोघांचेही जबाब घेण्यात आले असून दोघांनीही आपली कोणतीही तक्रार दिली नसल्याचे कणकवलीचे पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी सांगितले.