|Thursday, June 27, 2019
You are here: Home » Top News » सल्ला नाही, पाठिंबा दिला !एअरस्ट्राईकच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास, शरद पवारांकडून सावरासावर

सल्ला नाही, पाठिंबा दिला !एअरस्ट्राईकच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास, शरद पवारांकडून सावरासावर 

ऑनलाईन टीम / मुंबई :

पुलवामा हल्ल्यानंतर सरकारने केलेल्या एअर स्ट्राईकसंबंधीच्या माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केला आहे. सल्ला नाही तर पाठिंबा दिला असेही पवारांनी आपल्या फेसबुक पोस्टमधून स्पष्ट केले आहे.

पुलवामा घटनेनंतर केंद्र सरकारने दिल्लीत सर्वपक्षीय बैठक बोलवली होती. या बैठकीत भारतीय सैन्यदलाच्या पाठीशी राहण्याचा ठराव…

Posted by Sharad Pawar on Monday, March 18, 2019

पुलवामा हल्ल्याचा बदला घेतल्याचे पेडिट भाजप घेऊ लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला होता. दहशतवादी अड्डे माझ्या सल्ल्यानंतरच उध्वस्त केले असल्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. शिरूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचाराचा नारळ फोडल्यानंतर चाकणमध्ये काल रविवारी हा गौप्यस्फोट पवारांनी केला. पुलवामा हल्ल्यात चाळीस जवान शहीद झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दिल्लीत देशातील सर्व प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. मी माजी संरक्षण मंत्री असल्याने तिथे मला आता काय करायचे? असा पहिला प्रश्न विचारला गेला. त्यावर मी देशाच्या तिन्ही दलांना फ्री हँड देत, दहशतवादी अड्डे उध्वस्त करण्याचे आदेश द्या, असा सल्ला दिला. माझ्या या सल्ल्याला सर्व प्रमुख नेत्यांनी होकार दिला, असे पवारांनी सांगितले होते.