|Thursday, June 27, 2019
You are here: Home » उद्योग » आयडीबीआयच्या नामांतरास रिझर्व बँकेकडून विरोध

आयडीबीआयच्या नामांतरास रिझर्व बँकेकडून विरोध 

नवी दिल्ली

 आयडीबीआय बँकेकडून नामांतरासाठी दाखल केलेल्या प्रस्तावास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने नकार दिला आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) आयडीबीआयमधील 51 टक्के भाग भांडवल विकत घेतले आहे. त्यामुळे या बँकेच्या नावासकट सर्व महत्वाच्या गोष्टींची पुनर्रचना होणे अपेक्षित आहे. आयडीबीआय बँकेचे एलआयसी आयडीबीआय बँक लि. किंवा एलआयसी बँक लि. असे नामकरण करण्यात यावे. तसेच यामध्ये पहिल्या नावास प्राधान्य मिळावे, असा प्रस्ताव बँक संचालक मंडळाने मंजूर केला आहे. पण या बँकेचे नामांतर होऊ नये, असे मत आरबीआयने व्यक्त करत नाराजी व्यक्त केली आहे. तथापि, नामांतरासाठी आरबीआयव्यतिरिक्त केंद्रीय कंपनी व्यवहार मंत्रालय, भागधारक, स्टॉक एक्स्चेंज आदींचीही मंजुरी आवश्यक आहे.