|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शेगावचा वाळू माफिया पिंटू पाटील स्थानबध्द

शेगावचा वाळू माफिया पिंटू पाटील स्थानबध्द 

प्रतिनिधी / सोलापूर

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट तालुक्यातील वाळू मफिया आण्णाराव उर्फ पिंटू बाबूराव पाटील (रा. शेगाव, ता. अक्कलकोट) वर ग्रामीण पोलिसांनी स्थानबध्दतेची कारवाई करीत त्याला येरवाडा कारागृहाची हवा खाण्यास रवाना केले.

अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात त्याच्यावर खून करणे, खुनाचा प्रयत्न, अवैध वाळूची वाहतूक करणे, अवैधरित्या चोरुन वाळू वाहतूक करणे, वाळूचा साठा करणे, सरकारी कामात अडथळा करणे, सार्वजनिक ठिकाणी दंगा करणे, मालमत्तेचे नुकसान करणे तसेच वाळू उत्खनन करुन पर्यावरणाचा ऱहास करणे आदी प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. त्याने अक्कलकोट तालुक्यात वाळू तस्करी करुन मोठय़ा प्रमाणात दहशत निर्माण केली होती. त्यामुळे त्याच्याविरोधात पोलिसांनी वेळोवेळी कारवाई केली. मात्र त्याच्या वर्तनात कोणताच बदल झाला नाही. दरम्यान पाटील यास खुनाच्या गुह्यात तीन वर्षे कारावासाची शिक्षा झाली आहे. त्यानंतर त्याच्यावर तडीपारीची कारवाईही करण्यात आली होती.

  याबाबत अक्क्लकोट पोलीस ठाण्याच्या वतीने जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांच्याकडे प्रस्ताव सादर केला होता. हा प्रस्ता पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला होता. ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय पोलीस अधिकारी प्रितमकुमार यावलकर, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण सावंत, अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय जाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल भोसले, पोहेकॉ. चडचणकर व टू प्लस पथकाने पार पाडली.