|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » लोकसभा निवडणुकीसाठी अधिसूचना जाहीर

लोकसभा निवडणुकीसाठी अधिसूचना जाहीर 

प्रतिनिधी/ सोलापूर

लोकसभा निवडणुकीची अधिसूचना जाहीर झाली असून सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी आज मंगळवार 19 मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ होणार आहे. दरम्यान, नामनिर्देशनची प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी पत्रकारांना दिली.

 सोलापूर लोकसभा मतदारसंघात 18 मार्च रोजी अधिसूचना प्रसिध्द  झाली असून उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यात येणार असून सकाळी 11 ते 3 वाजेपर्यंतच्या कालावधीत नामनिर्देशनपत्र प्रक्रियेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात अर्ज विक्री होणार आहे. नामनिर्देशन पत्राची  प्रक्रिया पार पडणार आहे. मंगळवार 19 मार्च ते मंगळवार 26 मार्च दरम्यान इच्छुकांना उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे. 21 मार्च, 23 मार्च ते 24 मार्च रोजी शासकीय सुट्टी असल्यामुळे अर्ज स्वीकारण्यात येणार नाही असेही भोसले यांनी सांगितले.

 सभागृहात उमदेवारांची नोंदणी, सोबत फॉर्म नंबर 26 देण्यात येईल. फॉर्मबरोबरच 2 पानांची माहिती पुस्तीका देण्यात येणार असून यामध्ये 20 ते 45 सूचना असणार आहे. अनुमोदक, सूचक तसेच उमेवारांची माहिती भरून घेण्यात येणार आहे. या सभागृहात विविध फलके, नाव शोधणे, तसेच विविध माहिती कागदपत्रे ठेवण्यात आली आहे. तसेच सुरक्षितेच्या दृष्टकोनातून 8 पॅमेरे लावण्यात आले आहे. सोलापूर लोकसभा मतदार संघात शहर उत्तर, सोलापूर दक्षिण अक्कलकोट, शहर मध्य, मोहोळ आणि पंढरपूर, मंगळवेढा आदी तालुक्याचा समावेश आहे.

 पाच जणांनाच प्रवेश

उमेदवारी अर्ज दाखल करताना निवडणूक कार्यालयात उमेदवारांसह त्यांच्यासमवेत असलेल्या चार जणांना म्हणजेच एकूण पाच जणांना प्रवेश देण्यात येणार आहे. पाच जणांशिवाय इतरांना प्रवेश देण्यात येणार नाही. दिड मीटर परिसरात 3 गाडय़ांना प्रवेश देण्यात येणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.