|Sunday, January 26, 2020
You are here: Home » leadingnews » लोकसभा निवडणूकीत अमित शाहांची एन्ट्री ; अडवानींचा पत्ता कट

लोकसभा निवडणूकीत अमित शाहांची एन्ट्री ; अडवानींचा पत्ता कट 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची पाहिली यादी जाहीर होत असून भाजप अध्यक्ष अमित शाह यांना गांधीनगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसीतून उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे अडवानींचा पत्ता कट झाल्याचे स्पष्ट झाले आहे. 

गेल्या काही दिवसपासून अमित शहांना गांधीनगरमधून उमेदवारी देण्यात येणार असल्याच्या चर्चंना उधाण आले होते. आज अखेर त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. राज्यसभेवर खासदार राहिलेले शाह पहिल्यांदाच लोकसभा निवडणुक लढवणार आहेत त्यामुळे शहांना यंदा शहांना मोठो पद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 

 

Related posts: