|Monday, December 9, 2019
You are here: Home » Top News » भाजपची पहिली यादी जाहीर ,महाराष्ट्रातील 16 जागांसाठी उमेदवारी जाहीर

भाजपची पहिली यादी जाहीर ,महाराष्ट्रातील 16 जागांसाठी उमेदवारी जाहीर 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची पाहिली यादी जाहीर होत असून लालकृष्ण अडवानींचा पत्ता कट करता भाजप अध्यक्ष अमित शाह यांना गांधीनगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वाराणसीतून उमेदवारी देण्यात आली आहे. तर महाराष्ट्रातून 16 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून सुजय विखे ,रावसाहेब दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

   भाजपने आज 182 जागांसाठी उमेदवारी जाहीर केली होती तर महाराष्ट्रातील 16 जागांसाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अहमदनगर आणि जालन्यातून प्रथमच सुजय विखे आणि रावसाहेब दानवे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर इतर 14 जागांबाबत कुठल्याही बदल करण्यात आलेला नाही. तर माढा आणि दक्षिण मुंबईच्या उमेदवारीबाबत अजूनही सस्पेंन्स कायम आहे.

   महाराष्ट्रात 16 उमेदवार

अहमदनगर- सुजय विखे-पाटील

नंदुरबार – हिना गावित

रावेर- रक्षा खडसे

धुळे-सुभाष भामरे

सांगली -संजय काका पाटील

लातूर – सुधाकरराव शिंगारे

बीड- प्रीतम मुंडे

मुंबई उत्तर मध्य- पुनम महाजन

मुंबई उत्तर – गोपाळ शेट्टी

भिवंडी- कपिल पाटील

जालना- रावसाहेब दानवे

चंद्रपूर – हंसराज अहिर

गडचिरोली-चिमुरी- अशोक नेते

नागपूर- नितीन गडकरी

अकोला – संजय धोत्रे

वर्धा- रामदास तडस

 

Related posts: