|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात विंग पडून कर्मचाऱयाचा मृत्यू

पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात विंग पडून कर्मचाऱयाचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

पुण्यातील यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात विंग पडून कर्मचाऱयाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रंगमंच सहाय्यक विजय महाडिक यांना अपघातात प्राण गमवावे लागले.

    धनकवडीत राहणारे 45 वषीय विजय महाडिक हे यशवंतराव चव्हाण नाटय़गृहाचे कर्मचारी होते. काल मध्यरात्री दीड ते दोन वाजताच्या सुमारास ते स्टेज रिकामा करण्याचं काम करत असताना अपघात घडला. स्टेज रिकामा करण्यासाठी महाडिकांनी विंग हलवली, त्यावेळी नेमका लोखंडी रॉड त्यांच्या डोक्मयावर पडला. यामध्ये गंभीर जखम झाल्यामुळे महाडिकांचा मृत्यू झाला. नाट्यगृहात आज सकाळी होणाऱया ’हॅम्लेट’ नाटकाच्या प्रयोगासाठी महाडिक तयारी करत होते. पुण्यातील यशवंतराव चव्हाण हे महापालिकेचे नाट्यगृह आहे. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.