|Saturday, January 25, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मणिपाल तपासणी केंद्र बंदमुळे रुग्णांची गैरसोय

मणिपाल तपासणी केंद्र बंदमुळे रुग्णांची गैरसोय 

दोडामार्ग तालुक्यात माकडतापाचे महिनाभरात दोन रुग्ण

ग्रामस्थांत भीतीचे वातावरण

लवू परब / दोडामार्ग:

दोडामार्ग तालुक्यात काही वर्षापूर्वी सुरुवात झालेल्या माकडताप (के.एफ.डी) आजारावेळी तालुक्यात मणिपाल तपासणी कक्ष दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आला होता. मात्र, हा कक्ष 1 मार्चपासून बंद करण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील रुग्णांची मोठय़ा प्रमाणात गैरसोय निर्माण झाली आहे. बंद करण्यात आलेला कक्ष तात्काळ सुरू करण्याची मागणी तालुक्यातील ग्रामस्थांतून होत आहे.

माकडताप आजाराचा रुग्ण रुग्णालयात दाखल झाल्यावर रुग्णांचे रक्तनमुने तपासणीसाठी मणिपाल येथे पाठवावे लागत असे. त्यानंतर त्या रुग्णाला कोणता आजार झाला, हे स्पष्ट होत असे. या सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत बराच कालावधी जात असे. तोपर्यंत त्या रुग्णांची प्रकृती अधिक चिंताजनक होत असे. तात्काळ निदान होण्यासाठी दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात मणिपाल तपासणी केंद्र दाखल करण्यात आले हेते. 1 मार्चपासून हे केंद्र बंद करून सावंतवाडी येथील रुग्णालयात हलविण्यात आले.

माकडतापाची साथ असताना तपासणी केंद्र बंद

दोडामार्ग तालुक्यात अद्यापही माकडतापाचे रुग्ण मिळत असताना कक्ष अचानक बंद करण्यात आला. फेब्रुवारी महिन्यात कुडासे गावात माकडतापाचा रुग्ण आढळला होता. त्याच्यावर उपचार करून बरा करण्यात आला. त्यानंतर एका महिन्यानंतर पुन्हा त्याच कुडासे गावात पुन्हा आठवडाभरापूर्वी दुसरा रुग्ण आढळल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. मात्र, मणिपाल तपासणी केंद्र बंद झाल्याचे नागरिकांना समजताच रुग्णांनी दोडामार्ग रुग्णालयात न येता सरळ गोव्यातील रुग्णालय गाठले. गेल्या फेब्रुवारी महिन्यात कुडासे येथील एकाला माकडतापाची लागण झाली होती. त्याच्यावर उपचार करून त्याला बरा करण्यात आला होता. त्यानंतर महिन्यानंतर त्याच गावात पुन्हा माकडतापाचा दुसरा रुग्ण आढळला. यामुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Related posts: