|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » Top News » उद्यापर्यंत अंतर्गत वाद मिटवा, मग सांगलीची जागा द्या – राजू शेट्टी

उद्यापर्यंत अंतर्गत वाद मिटवा, मग सांगलीची जागा द्या – राजू शेट्टी 

ऑनलाईन टीम / सांगली :

महाआघाडीमध्ये सांगलीच्या जागेवरुन तिढा अजूनही कायम आहे. सांगलीच्या जागेवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी काँग्रेसला उद्यापर्यंतचा अल्टीमेटम दिला आहे. आमचा फक्त सांगलीसाठी आग्रह नव्हता, तरीपण, विनाकारण स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून वसंतदादा कुटुंबावर अन्याय केला जात असल्याबाबतचे चुकीचं वातावरण निर्माण केले जाते. आम्हाला आरोपीच्या पिंजऱयात उभे करणे चुकीचे आहे त्यामुळे सांगलीच्या जागेबाबत उद्यापर्यंत निर्णय घ्या असा इशारा राजू शेट्टी यांनी काँग्रेसला दिला आहे.

यावेळी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, प्रतीक आणि विशाल पाटील यांनासुद्धा सांगलीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून लढण्यास आम्ही ऑफर दिली होती. मात्र त्यांनी नकार दिला. सांगलीत स्वाभिमानीकडे दोन ते तीन उमेदवार आहेत, योग्य वेळी जाहीर करू मात्र आघाडीकडून सांगली द्यायची असेल तर काँग्रेसमधील अंतर्गत वाद मिटवून मगच आम्हाला द्या असे राजू शेट्टी यांनी सांगितले. एखाद्या जागेचा विचका करून आम्हाला जर सांगली देत असाल, तर या जागेत आम्हाला रस नाही, असेही आम्ही काँग्रेसला कळवले आहे. बंडखोऱया आणि वादग्रस्त झालेली जागा घ्यायची किंवा नाही याचा आम्हाला विचार करावा लागेल असे सांगत राजू शेट्टी यांनी सांगलीच्या बदल्यात शिर्डी किंवा बुलढाणा जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्यात यावी अशी मागणी खासदार राजू शेट्टी यांनी केली. सांगलीची जागा काँग्रेसकडून राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडण्यात येणार असल्यावरुन स्थानिक काँग्रेस कार्यकर्तेही नाराज झाले होते. याविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी सांगली जिल्हा काँग्रेस कार्यालयाला टाळे ठोकले होते.

 

Related posts: