|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश

अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा यांचा भाजपात प्रवेश 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

प्रख्यात अभिनेत्री आणि माजी खासदार जयाप्रदा यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर मतदारसंघातून जयाप्रदा समाजवादी पक्षाचे उमेदवार आझम खान यांच्याविरोधत निवडणूक लढवणार आहेत.

 

भाजपमध्ये प्रवेश केल्याचा आनंद जयाप्रदा यांनी व्यक्त केला. ‘ज्या पक्षाचे नेतृत्व देशाच्या सुरक्षेच्या मुद्यावर लक्ष घालते, अशा राष्ट्रीय पक्षात मी आहे. पंतप्रधन नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात काम करता येणार आहे, याचा आनंद आहे’ असे जयाप्रदा म्हणाल्या. भाजपचे राष्ट्रीय महासचिव भूपेंद्र यादव यांच्या उपस्थितीत जयाप्रदांनी भाजपप्रवेश केला.

 

1994 साली तेलुगू देसम पक्षातून जयाप्रदा यांनी राजकीय कारकीर्दीला सुरुवात केली. मात्र चंद्राबाबू नायडूंसोबतच्या मतभेदानंतर त्यांनी पक्षाला रामराम ठोकत समाजवादी पक्षात प्रवेश केला. जयाप्रदा यांनी 2004 आणि 2009 मध्ये सपातर्फे खासदारपद भूषवले आहे.