|Monday, February 17, 2020
You are here: Home » Top News » तुमचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण ? अमित शहांचा विरोधकांना सवाल

तुमचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण ? अमित शहांचा विरोधकांना सवाल 

ऑनलाईन टीम / मुरादाबाद :

विरोधी पक्षाकडे ना नेता आहे, ना निती आहे, स्वार्थासाठी एकत्र येऊन या पक्षांनी आघाडी केली. या लोकांना कोणताही विचार नाही. धोरण नाही. नेतृत्वहिन आघाडी आहे. ही आघाडी देशाचे भले करु शकत नाही. देशाला प्रगतीच्या मार्गावर घेऊन जाऊ शकत नाही. तुमचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण आहे असा सवाल करत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे अमित शहा हे भाजपाच्या विजय संकल्प रॅलीला संबोधित करत होते.

यावेळी अमित शहा म्हणाले, भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात एनडीएसोबत आगामी निवडणुकीत उतरली आहे. तर दुसरीकडे राहुल गांधी आणि विरोधी नेते आघाड्या घेऊन पुढे आहे. आम्ही निवडणूक जिंकल्यानंतर आमचे नेते नरेंद्र मोदी पंतप्रधान बनतील हे आमचे ठरलेले आहे. मात्र तुमचे नेतृत्व कोण आहे? देशात मौनीबाबा मनमोहन सिंग यांचे सरकार नाही तर नरेंद्र मोदी यांचे सरकार हवे. पाकिस्तानच्या घरात घुसून आम्ही सर्जिकल स्ट्राइक केले. दहशतवाद्यांना धडा शिकवण्याचे काम भाजपा करत आहे. पुलवामा हल्ल्यात 40 जवान शहीद झाले. पूर्ण देश आक्रोशात होता. पाकिस्तानकडून सीमेवर सैन्य तैनात करण्यात आले पाकिस्तानला मोदी सरकारची भिती वाटत होती त्यांना वाटत होते की पुन्हा भारत आपल्यावर सर्जिकल स्ट्राइक करेल मात्र मोदींनी हवाई स्ट्राइक करत पाकिस्तानला जोरदार धडा शिकवला. आपल्या सीमेशी कोणी खेळण्याचा प्रयत्न केला तर काय होऊ शकते हे नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले. एअर स्ट्राइकनंतर देश आनंदात होता तर काँग्रेसचे मंडळी दुखः व्यक्त करत होती असेही अमित शहा म्हणाले.

Related posts: