|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » उद्योग » भारतातील ग्राहकांना सेवा देण्यात सॅमसंग बँण्ड सर्वोच्च स्थानी

भारतातील ग्राहकांना सेवा देण्यात सॅमसंग बँण्ड सर्वोच्च स्थानी 

टीआरए रेटींग संस्थेच्या अहवालात माहिती : अन्य कंपन्यांची वर्गवारी विभागानूसार सादर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दक्षिण कोरियातील स्मार्टफोनसह अन्य टेक्नॉलॉजी संदर्भातील सुविधा, नवनवी न उत्पादनाचे निर्मिती करण्यात अग्रेसर असणारा सॅमसंग ब्रँण्ड आपली समाधानकारक सेवा भारतातील ग्राहकांना देण्यात टॉपवर राहिला असल्याचे टीआरए या मूल्यमापन करणाऱया कंपनीच्या अहवालात सांगण्यात आले आहे. सॅमसंग कंपनीने एक वर्षांत आठ अंकानी सुधारणा करत ही झेप घेतल्याचे नेंदवण्यात आले.

सॅमसंग 2018मध्ये करण्यात आलेल्या मूल्यमापनावेळी आठव्या स्थानावर होते. टाटा मोटर्सला यात दुसरा क्रमाक पटकावण्यात यश मिळाले आहे. टाटा हा मागील वर्षात प्रथम स्थानी होते. तर ऍपल तिसऱया, मोटोकॉर्प चौथ्या आणि नायकी पाचव्या स्थानावर राहिल्याचे नेंदवले. तर यावेळी कंपन्यांची वेगवेगळी वर्गवारी सादर करण्यात आली.

टाटा मोटर्स नंबर 1

सर्वसाधारण करण्यात आलेल्या वर्गवारीतील मूल्यांकनात चार चाकी वाहनांची निर्मिती करणाऱया कंपन्यांमध्ये टाटाने बाजी मारली आहे. तर व्यावसायीक वाहनांमध्ये आयशरने पहिले स्थान मिळवले आहे.

बँकिंग फायनान्स सेवा

सदरच्या अहवालात बँकिंग, फायनान्स आणि इन्शुरन्स कंपन्याच्या कार्यामधून ग्राहकांना दिल्या जाणाऱया सेवेत एलआयसीला एलआयसीला सहावे स्थान मिळाले व एचडीएफसीला दुसरे आणि स्टेट बँक ऑफ इंडिया तिसरे स्थान मिळाले आहे.

बँकांच्या दिल्या जाणाऱया सुविधामध्ये स्टेट बँक पहिल्या प्रमाकावर आहे. पंजाब नॅशनल दुसऱया आणि बँक ऑफ इंडियाचा तिसरा नंबर लागतो. फायनान्समधील मुथूट फायनान्स प्रथम आणि सुंदरम फायनान्स दुसऱया नंबरवर राहिलेत.

फक्त बँण्डचे मूल्यांकन

टीआरएकडून सादर करण्यात आलेल्या वेगवेगळय़ा क्षेत्रांतील कंपन्याचा कार्याचा आढावा घेत त्यातून योग्य व समाधानकारक सेवा देणाऱया 11 हजार  ब्रँण्डची वर्गवारी अनुमान नोंदवून ही 500 बेस्ट बँण्डची यादी सादर केल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले.

Related posts: