|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » केंद्रीय भरतीसाठी मराठा समाजास आर्थिकदृष्टय़ा दुर्बल प्रमाणपत्र द्या

केंद्रीय भरतीसाठी मराठा समाजास आर्थिकदृष्टय़ा दुर्बल प्रमाणपत्र द्या 

प्रतिनिधी/कोल्हापूर

   मराठा समाजास महाराष्ट्र राज्य सरकारने आरक्षित प्रवर्ग सोडून ओपन कॅटेगरीत आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी 10 टक्के आरक्षण लागू केले. मात्र महराष्ट्र शासनाने मराठा समाजास केंद्र शासनाच्या नोकरीसाठी अर्ज करताना आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी वेगळी तरतुद केली नाही. यामुळे केंद्रीय 10टक्के आरक्षणामध्ये मराठा समाज वंचीत राहणार असल्याने केंद्रीय भरतीसाठी मराठा समाजाला आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांचे प्रमाणपत्र द्यावे अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले.

   रेल्वे विभागामध्ये 1 लाख पेक्षा जास्त नोकर भरतीची जाहिरात निघाली आहे. याची फॉर्म भरण्याची अंतिम मुदत 31 मार्च 2019 आहे. केंद्र सरकार आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकासाठी 10 टक्के आरक्षण लागू केले आहे. महाराष्ट्र राज्य सरकारने आरक्षित प्रवर्ग सोडून ओपन कॅटेगरीत आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठी 10 टक्के आरक्षण लागू केले. यामध्ये महाराष्ट्रात मराठा प्रवर्ग एसईबीसी अंतर्गत आरक्षण असल्याने महाराष्ट्रात मराठा समाविष्ठ केलेला नाही. परंतु केंद्र सरकारच्या नोकरीसाठी अर्ज करताना मराठा समाज खुल्या प्रवर्गात येईल कारण मराठा समाजाचे आरक्षण महाराष्ट्रापुरते मर्यादित आहे. महाराष्ट्र शासनाने मराठा समाजास केंद्र शासनाच्या नोकरीसाठी अर्ज करताना आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकासाठी वेगळी तरतुद केलेली नाही. त्यामुळे केंद्रीय 10 टक्के आरक्षणामध्ये मराठा समाज वंचित राहणार आहे. रेल्वे भरतीची संधीही जाणार आहे. तरी केंद्रीय भरतीमध्ये मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण मिळण्यासाठी आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटक दाखल द्यावा  यासाठी योग्य ते आदेश देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.

   यावेळी मराठा महासंघाचे प्रकाश पाटील, अवधुत पाटील, महादेव पाटील, शरद साळुंखे, जितेंद्र चव्हाण, लहुजी शिंदे, रविंद्र कांबळे, विजय डाफळे, आशिष डाफळे, जितेंद्र चव्हाण आदि उपस्थित होते.