|Thursday, November 21, 2019
You are here: Home » Top News » शेअर बाजाराची ऐतिहासिक उसळी, सेन्सेक्स ३९ हजारांवर

शेअर बाजाराची ऐतिहासिक उसळी, सेन्सेक्स ३९ हजारांवर 

ऑनलाईन टीम /  मुंबई :

आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजाराने पहिल्यांदाच नवा उच्चांक गाठत ३९ हजारांचा टप्पा गाठला आहे. मात्र त्यानंतर सेन्सेक्सच्या अंकात घसरण होऊन तो ३८,८५९.८८ अंकावर थांबला. तर निफ्टीने ११.६६५.२० चा टप्पा गाठला आहे. 

आज सकाळी १०.१८ वाजता सेन्सेक्सने नवा विक्रम प्रस्थापित केला. शेअर बाजार सुरू होताच सेन्सेक्सने ३९ हजारावर उसळी घेतली. मात्र त्यानंतर सेन्सेक्समध्ये घसरण झाली. पण तरीही सेन्सेक्स १८५.९७ अंकांनी मजबूत होऊन ३८,८५९.८८ अंकांवर पोहोचला. ४१.३ अंकांच्या वाढीसह निफ्टीनेही ११,६६५.२० अंकाचा टप्पा गाठला. या पूर्वी ९ ऑगस्ट २०१८ रोजी सेन्सेक्सने पहिल्यांदा ३८ हजाराची उसळी घेतली होती.

Related posts: