|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » अनुपम कांबळीला सशर्त जामीन मंजूर

अनुपम कांबळीला सशर्त जामीन मंजूर 

प्रतिनिधी / ओरोस:

एका बांधकाम व्यावसायिकाकडे लाखो रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या अनुपम अजित कांबळी याला ओरोस येथील मुख्य न्यायदंडाधिकारी वर्षाराणी पत्रावळे यांनी 15 हजारांचा सशर्त जामीन मंजूर केला. संशयिताच्यावतीने ऍड. वीरेश नाईक यांनी काम पाहिले.

पोलिसांत दाखल तक्रारीनुसार, ओट्रा बिल्डर्स ऍण्ड डेव्हलपरचे मालक सचिन ओटवणेकर यांच्या ओरोस फाटा येथे ओट्रा रेसिडेन्सी पार्क या इमारतीच्या सुरू असलेल्या कामामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचे कारण पुढे करत अनुपमने अनेकवेळा नाहक त्रास दिला. या बांधकामाच्या बाजूने जाणाऱया नाल्याची त्यांनी दिशा बदलली व काही भाग बुजविला, अशा तक्रारी करून तो ओटवणेकर यांना त्रास देत होता. याप्रकरणी त्याने अनेक तक्रारीही केल्या होत्या. तक्रारी मागे घेण्यासाठी त्याने ओटवणेकर यांच्याकडे पैशांची व फ्लॅटची मागणी केली होती. दरम्यान, फ्लॅटची किंमत 25 लाख रुपयांच्या आसपास होत असल्याने ही मागणी चुकीची असल्याचे ओटवणेकर यांनी त्याला समजावले होते. याबाबतचे शूटिंगही त्यांनी केले आहे. त्यानंतर त्याने 20 लाख रुपयांची मागणी करत मारण्याची धमकी दिली. त्यामुळे जीविताला धोका असल्याने ओटवणेकर यांनी ओरोस पोलिसांत याबाबतची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार त्याच्यावर भादंवि कलम 384 व 389 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हा अन्वेषण आणि ओरोस पोलिसांनी त्याला गुरुवारी 28 मार्चला रात्री कणकवली येथून ताब्यात घेतले होते. शुक्रवारी 29 रोजी त्याला न्यायालयाने त्याला 2 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती. 2 एप्रिलला त्याला न्यायालयीन कोठडी मंजूर करण्यात आले होती.

न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याने वकिलांमार्फत जामिनासाठी अर्ज केला होता. तपासकामात हस्तक्षेप करू नये, या अटींसह त्याला जामीन मंजूर कण्यात आला.