|Friday, October 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » सुरेश खोपडे लिखित पुस्तकाचे प्रकाशन

सुरेश खोपडे लिखित पुस्तकाचे प्रकाशन 

पुणे / प्रतिनिधी :

सेवानिवृत्त आय.पी.एस. सुरेश खोपडे लिखित ‘अठरा पगड मावळे शिवशाही-चेहरे नको व्यवस्था बदलूया’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा रविवार दि. 7 एप्रिलला सायंकाळी 5.30 वा. राष्ट्रसेवादल सभागृह, सिंहगड रोड येथे होणार आहे. यावेळी डॉ कुमार सप्तर्षी यांच्याहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. राजकारण व प्रशासनाबद्दल सर्वांगाने शोध घेणारे व उपाय योजना सांगणारे ते मराठीतील पहिलेच क्रांतिकारक पुस्तक आहे, अशी माहिती सुरेश खोपडे यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.