|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » उद्योग » बँक ऑफ इंडियाची 25 टक्के हिस्सेदारी इन्शुरन्स व्यवसायाला

बँक ऑफ इंडियाची 25 टक्के हिस्सेदारी इन्शुरन्स व्यवसायाला 

रेग्युलेटरी फायलिंगमध्ये माहिती सादर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

बँक ऑफ इंडिया लवकरच इन्शुरन्स जाइंट व्हेंचर (जेवी) स्टार यूनियन दाय-इची लाईफ इन्शुरन्स कंपनी (एसयुडी लाइफ) मध्ये आपली 25.05 टक्के हिस्सेदारी विकणार असल्याची घोषणा रेग्युलेटरी फायलिंगमध्ये ही माहिती दिलेली आहे.  यात शेअर्स विक्रीसाठी फ्लोर किंमत 170.50 रुपये करण्यात आलेली आहे. याच हिशोबानी 6.68 कोटीचे शेअर्सची विक्री करुन 1,106 कोटी रुपये जमा होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. रक्कम जमा करण्यासाठी आणि नॉन कोर ऍसेस्टस कमी करण्यासाठी बँक ऑफ इंडिया जेवीला हिस्सेदारी विकत आहे. यासाठी बँकेने 12 एप्रिलपर्यत खरेदी दाराकडून बोलीसाठीचे प्रस्ताव जमा करण्याची घोषणा केलेली आहे. 2009 मध्ये एसयूडी जॉइंट व्हेंचर तयार झाली होती. एप्रिल ते डिसेंबर 2018 मध्ये प्रीमियमच्या माध्यामातून 1 हजार 211 कोटी रुपये आलेत. तर कर जमा केल्यानंतर 55 कोटी रुपयाच्या फायद्याची नोंद ही करण्यात आली होती.

रिझर्व्ह बँकेकडून या वर्षातील जानेवारीत पीसीएसच्या यादीत समावेश असणाऱया बँकांना सरकार वित्तपुरवठा करणार असून त्यामुळे बँकांना दिलासा मिळणार असल्याचे म्हटले होते. त्यामध्ये बँक ऑफ इंडियाला यादीतून मुक्त करण्यात आलेले आहे. त्यामुळे बँकेला नवीन कर्ज देण्याचा रस्ता रिकामा झाला आहे.