|Monday, December 16, 2019
You are here: Home » leadingnews » काँग्रेसची अवस्था टायटॅनिकसारखी

काँग्रेसची अवस्था टायटॅनिकसारखी 

 नांदेड / प्रतिनिधी  :  काँग्रेसची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी झाली असून, दिवसेंदिवस ते बुडतच चालले आहे. काँग्रेससोबत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसारखे मित्रही एकतर स्वतः बुडत आहेत किंवा काँग्रेसची साथ सोडून पळ काढत आहेत, अशी खरमरीत टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी येथे केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रचारसभा आज नांदेड येथे आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. मोदी म्हणाले, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची अवस्था टायटॅनिक जहाजासारखी झाली आहे. कारण मागील पाच वर्षात या दोन्ही पक्षांविरोधातला जनतेचा रोष कायम आहे. महाराष्ट्रात काँग्रेस कमकुवत झाली आहे. त्यांच्याकडे आमच्याविरोधात बोलायला मुद्दे नाहीत. आदर्श घोटाळा कुणी केला हे तुम्ही विसरलात का? काँग्रेस पक्ष फुटीरतावाद्यांच्या बाजूने आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

राहुल गांधी सुरक्षित ठिकाणी पळाले

राहुल गांधी सुरक्षित मतदारसंघात पळाले, हे अमेठीच्या लोकांनी लक्षात ठेवावे. अनेक दिग्गज काँग्रेस नेत्यांनी निवडणुकीत माघार घेतली आहे. शरद पवारांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. प्रफुल्ल पटेल यांनीही निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या सगळय़ांनी निवडणूक होण्याआधीच मैदान सोडले आहे, असाही टोला मोदींनी लगावला.

काँग्रेसला दोन पंतप्रधान हवेत

काँग्रेसला दोन पंतप्रधान हवेत. एक दिल्लीत आणि दुसरा जम्मू-काश्मीरमध्ये. ‘आप्सा’ कायदा रद्द करून देशातील जवानांच्या जीवावर उठली आहे. काँग्रेस पाकिस्तानकडून पैसे घेणाऱया अलिप्ततावाद्यांची मदत घेत आहे. भारताचे तुकडे करू पाहणाऱया लोकांची साथ देण्यासाठी सरसावली आहे. देशाचे तुकडे करू पाहणाऱया लोकांच्या मदतीसाठी ‘आप्सा’सारखा कायदा हटविण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. काँग्रेसने सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देशातील दहशतवाद, नक्षलवाद ही काँग्रेसने लावलेली आग आहे. काँग्रेस आणि त्यांना पाठिंबा देणारे 21 पक्ष यामध्ये सहभागी होत आहेत. देशात काँगेसनेच दहशतवाद पोसला आहे. बोफोर्स, हेलिकॉप्टरसारख्या खरेदीमध्ये मोठय़ा प्रमाणावर दलाली घोटाळा झाला आहे. हेलिकॉप्टर दलाली कोणी खाल्ली. एक मुलगा, एक आई आणि एक मामा यांनीच यातले पैसे खाल्ले आहेत, असा टोलाही मोदी यांनी या वेळी लगावला.

 

Related posts: