|Friday, December 13, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » ‘अंतराळसैन्या’च्या दिशेने भारताची वाटचाल?

‘अंतराळसैन्या’च्या दिशेने भारताची वाटचाल? 

शक्ती मोहिमेद्वारे संकेत : अंतराळात युद्धक्षमता वाढविण्याचे प्रयत्न, उपग्रहांच्या सुरक्षेकरता उपाययोजना

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

 मागील महिन्यात उपग्रहभेदी (ए-सॅट) क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीनंतर भारत आता अंतराळातील शत्रूंना नेस्तनाबूत करण्याची क्षमता विकसित करण्यासह अनेक पर्यायांकरता वेगाने वाटचाल करत आहे. यात डायरेक्टेड एनर्जी वेपन्स आणि को-ऑर्बिटल किलर्सच्या निर्मितीसह स्वतःच्या उपग्रहांना इलेक्ट्रॉनिक किंवा फिजिकल अटॅक्सपासून वाचविण्याची क्षमता निर्माण करण्यासारखे उपाय सामील असणार आहेत.

डायरेक्टेड एनर्जी वेपन्स, लेजर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक पल्स (ईएमपी) आणि को-ऑर्बिटल वेपन्स समवेत अनेक तंत्रज्ञानावर काम करत आहोत, असे डीआरडीओचे प्रमुख जी. सतीश रेड्डी यांनी सांगितले आहे. 27 मार्च रोजी लो-अर्थ ऑर्बिटमध्ये 283 किलोमीटर अंतरावरून मायक्रोसॅट-आर उपग्रह नष्ट करणारे ए-सॅट क्षेपणास्त्र दिशानिर्देशित गतिमान मारक शस्त्र (डायरेक्टसेंट, कायनेटिक किल वेपन) होते. अंतराळात 1000 किलोमीटरचे अंतर गाठू शकणाऱया त्रिस्तरीय इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांच्या एकाचवेळी होणाऱया अनेक प्रक्षेपणाच्या माध्यमातून कित्येत उपग्रह नष्ट केले जाऊ शकतात, असे डीआरडीओ प्रमुखांनी म्हटले आहे.

चीनचे आव्हान

को-ऑर्बिटल वेपन मूळस्वरुपात एक उपग्रह असून त्यात काही स्फोटके, शस्त्रs किंवा डीईडब्ल्यू उपकरणे बसविण्यात आली आहेत. को-ऑबिर्टल वेपन सर्वप्रथम अंतराळाच्या कक्षेत स्थापित केल्यानंतर त्याद्वारे शत्रूच्या उपग्रहांना लक्ष्य केले जाते. चीन या कायनेटिक किल वेपन्ससह अन्य उपग्रहविरोधी शस्त्रs म्हणजेच लेजर्स जामर्स, ईएमपी आणि हायपॉवर्ड मायक्रोवेव्स इत्यादींची वेगाने निर्मिती करत आहे. चीनने 2007 मध्ये उपग्रहभेदी क्षेपणास्त्राची चाचणी लो-ऑर्बिट वेदर उपग्रह भेदून केली होती.

एअरोस्पेस मिलिट्री कमांड

उपग्रहभेदी यंत्रणेचे शस्त्राrकरण किंवा एक फुलफ्लेज्ड एअरोस्पेस मिलिट्री कमांड निर्माण करण्याच्या मुद्यावर अंतिम निर्णय सरकारलाच घ्यावा लागणार आहे. सैन्य क्षमतेच्या दृष्टीकोनातून अंतराळाचे महत्त्व वाढले आहे. सुरक्षा सुनिश्चित करण्याचा सर्वोत्तम उपाय प्रतिबंधक क्षमता वाढविणे आहे. सध्यातरी नव्या उपग्रहभेदी क्षेपणास्त्राच्या चाचणीवर काम केले जात नसल्याचे डीआरडीओ प्रमुखांनी सांगितले आहे.

भविष्याच्या तयारीत वैज्ञानिक

जागतिक प्रतिस्पर्धेत चुरशीची टक्कर देण्यासह एलईओ आणि जीईओ सिंक्रोनस ऑर्बिट्समधील उपग्रहांच्या विरोधात ए-सॅट शस्त्र विकसित करण्याच्या दूरगामी लक्ष्यावर भारत काम करत आहे. अंतराळात वाढत चालेल्या सामरिक संपदेवरील धोक्यांना रोखण्याचे यामागे उद्दिष्ट आहे. ईएमपी आमच्या उपग्रह आणि सेंसर्सना सुरक्षा कवच प्रदान करत असून त्यांचा वापर शत्रूंपासून अंतराळसंपदेला सुरक्षित ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. शत्रूकडून देशाच्या मुख्य उपग्रहांना लक्ष्य करण्यात आल्याच्या स्थितीत सैन्याच्या मागणीनुसार छोटय़ा उपग्रहांच्या प्रक्षेपणाच्या योजनेवरही काम होतेय, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.

 

Related posts: