|Sunday, December 8, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » ‘डिजिटल करा’ला फ्रान्सची मंजुरी

‘डिजिटल करा’ला फ्रान्सची मंजुरी 

     फेसबुक, गुगलकडून कर आकारण्याची तयारी

पॅरिस :

फ्रान्सच्या खासदारांनी फेसबुक आणि ऍपल यासारख्या दिग्गज तंत्रज्ञान कंपन्यांवर एक नवा कर लादण्यास सोमवारी मंजुरी दिली आहे. या कराच्या तरतुदीमुळे फ्रान्सला अमेरिकेच्या नाराजीला तोंड द्यावे लागत आहे. अशाप्रकारचे पाऊल उचलल्याबद्दल फ्रान्सला गर्व वाटत असल्याचे अर्थमंत्री ब्रूनो ले मायरा यांनी म्हटले आहे.

अमेरिकेने फ्रान्सला हे विधेयक टाळण्याचे आवाहन केले होते. हे विधेयक अमेरिकेच्या कंपन्या तसेच फ्रान्सच्या नागरिकांना प्रभावित करणार असल्याचा दावा अमेरिकेचे विदेशमंत्री माइक पॉम्पियो यांनी केला होता.

नॅशनल असेंब्लीत हा प्रस्ताव 55 मतांसह मंजूर करण्यात आला आहे. तर प्रस्तावाच्या विरोधात 4 मते पडली आहेत. 5 खासदारांनी मतदानात भाग घेणे टाळले आहे. विधेयकाला कायद्याचे स्वरुप देण्यापूर्वी ते सिनेट किंवा वरिष्ठ सभागृहात मतदानासाठी मांडले जाणार आहे. या कायद्याला ‘गाफा’ (गुगल, अमेझॉन, फेसबुक आणि ऍपल) नाव देण्यात आले आहे. जगाच्या सर्वात धनाढय़ कंपन्यांपैकी काही कंपन्यांना अल्प करभरणामुळे नाराजीला तोंड द्यावे लागत असताना हा कायदा प्रस्तावित करण्यात आला आहे.

फ्रान्सला अशाप्रकारच्या विषयांवर नेतृत्व करण्यास अभिमान वाटत आहे. हा मसुदा 21 व्या शतकासाठी अधिक प्रभावी आणि निष्पक्ष करप्रणालीच्या दिशेने एक पाऊल आहे. डिजिटल क्षेत्राच्या दिग्गज कंपन्या ग्राहकांच्या आकडेवारीतून भरभक्कम नफा कमावितात. पण फ्रान्समध्ये होणाऱया लाभावर विदेशात कर भरला जातो. हा प्रकार पूर्णपणे अस्वीकारार्ह असल्याचे विधान फ्रान्सच्या अर्थमंत्र्यांनी केले आहे.

Related posts: