|Tuesday, January 21, 2020
You are here: Home » आवृत्ती » पुणे » ‘जागर समतेच्या विचारांचा कार्यक्रम’

‘जागर समतेच्या विचारांचा कार्यक्रम’ 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात दि. 11 ते 13 पर्यंत आयोजन

 पुणे / प्रतिनिधी :

जागर समतेच्या विचारांचा या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी यांच्यावतीने महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती महोत्सवानिमित्त ‘जागर समतेच्या विचारांचा’ या तीन दिवशीय व्याख्यानमालेचे व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम दि. 11 ते 13 एप्रिल पर्यंत होणार असुन कार्यक्रमाचे उद्घाटन दि. 11 रोजी सायंकाळी 5 वा. कुलगुरू डॉ नितीन करमळकर यांच्याहस्ते होणार आहे, अशी माहिती अविनाश कांबळे यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी सुर्यकांत गायकवाड, जयकर गायकवाड आदी उपस्थित होते.

यावेळी दि. 11 रोजी पहिल्या सत्रात प्रसिध्द इतिहास संशोधक व वक्ते श्रीमंत कोकाटे, आर्मी इस्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजीचे डॉ. पी.आर.सोनवणे यांची व्याख्याने व रात्री 8.30 वा. वृषाली रणधीर यांच्या ‘मी सावित्री बोलतेय’ हा एकपात्री प्रयोग होणार आहे. तसेच दि. 12 रोजी दुसऱया सत्रात नाशिकच्या बिटको महाविद्यालयाच्या प्रा. डॉ इंदिरा आठवले, सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार दादाभाऊ अभंग यांचे व्याख्यान व रात्री 8 वा. महात्मा फुले ते भीमराय या शाहिरी जलशाचा कार्यक्रम होणार आहे.

तसेच दि. 13 रोजी तिसऱया सत्रात आय.आय.ई.चे संचालक मरझबन झाल, बाबुराव बनसोडे, यांचे व्याख्यान व रात्री 8.30 वा. कुमार आहेर यांचे मी तुकाराम बोलतोय हे एकपात्री नाटक होणार आहे, असे यावेळी सांगण्यात आले.

Related posts: