|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कोरेगावात उद्या उद्या आदित्य ठाकरेंची सभा

कोरेगावात उद्या उद्या आदित्य ठाकरेंची सभा 

प्रतिनिधी/ सातारा

भाजप-शिवसेना-रिपाइं महायुतीचे सातारा लोकसभेचे उमेदवार नरेंद्र पाटील यांच्या प्रचारासाठी उद्या शुक्रवार 12 रोजी कोरेगावात शिवसेनेचे युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. कोरगाव येथील बाजार मैदानावर सायंकाळी 5 वाजता ही सभा होणार असल्याची माहिती शिवसेना युवा सेनेचे सातारा
जिल्हाप्रमुख रणजितसिंह भोसले यांनी दिली.

या सभेस सेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते, उपनेते व संपर्कप्रमुख नितीन बानुगडे पाटील, दगडूदादा सपकाळ यांचीही उपस्थिती लाभणार असून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत जाधव, जयवंतराव शेलार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर, रिपाइंचे अशोक गायकवाड, महिला आघाडीच्या शारदा जाधव, विद्यार्थी सेनेचे संभाजी पाटील तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख, तालुकाप्रमुख या सभेस उपस्थित राहणार असून सर्वांनी या सभेस उपस्थित रहावे, असे आवाहन रणजितसिंह भोसले यांनी केले आहे…..

 

Related posts: