|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » Top News » अमिताभ बच्चन यांनी भरला 70 कोटींचा कर

अमिताभ बच्चन यांनी भरला 70 कोटींचा कर 

ऑनलाईन टीम / मुंबई :

बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनी 2018-19 या आर्थिक वर्षाततब्बल 70 कोटी रुपयांचा कर भरला आहे. अमिताभ बच्चन यांच्या कार्यालयाकडून याबाबतची माहिती देण्यात आली आहे.

पुलावामा दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबाना प्रत्येकी 10 लाखांचा मदतनिधी अमिताभ यांनी दिला आहे. तसेच बिहारच्या मुजफ्फरपूर येथील 2,084 शेतकऱयांचे कर्जही त्यांनी फेडल्याची माहिती त्यांच्या प्रवक्त्याने दिली आहे. अमिताभ यांनी समाजहिताचाही विचार करुन अनेक ठिकाणी त्यांनी मदतीचा हात पुढे केला आहे.