|Monday, August 26, 2019
You are here: Home » Top News » मल्ल्या, नीरव नव्हे तर 36 उद्योगपती देशातून फरार

मल्ल्या, नीरव नव्हे तर 36 उद्योगपती देशातून फरार 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

मद्यसम्राट विजय मल्ल्या आणि हिऱयांचा व्यापारी नीरव मोदीच केवळ भारतातून कर्जबुडवून पळून गेले नाहीत. तर 36 उद्योगपती देशातून पळून गेले आहेत. त्याचप्रमाणे ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर घोटाळय़ात अटक करण्यात आलेला संरक्षण क्षेत्रातील दलाल सुषेन मोहन गुप्ता हाही पळून जाण्याची शक्मयता सक्तवसुली संचालनालयाने वर्तविली आहे. त्यामुळे गुप्ताच्या जामीन अर्जाला ईडीने विरोध केला आहे. सक्तवसुली संचालनालयाने सोमवारी विशेष न्यायाधीश अरविंद कुमार यांच्या न्यायालयाला केवळ विजय मल्या आणि नीरव मोदीच नाही तर अलीकडच्या काळात यांच्यासह 36 उद्योगपती देशातून पळून गेले असल्याची माहिती दिली आहे.