|Saturday, February 29, 2020
You are here: Home » Top News » छत्तीसगडला पुन्हा हिंसेकडे नेण्याचा कट

छत्तीसगडला पुन्हा हिंसेकडे नेण्याचा कट 

 

 ऑनलाईन टीम / छत्तीसगड :  काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील आश्वासनांमुळं नक्षलवाद्यांचं मनोधैर्य वाढलं आहे. त्यामुळंच नक्षलवादी हल्ले होत आहेत, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर केला. दरम्यान, छत्तीसगड राज्याला पुन्हा हिंसेकडे नेण्याचा कट आखला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला.

पंतप्रधान मोदींनी प्रचारसभेतील भाषणात काँग्रेसवर अनेक आरोप केले. काँग्रेस पक्षाचे लोक नक्षलवाद्यांना क्रांतिकारक म्हणत होते. विधानसभा निवडणुकांवेळी या ठिकाणी आलो होतो. त्यावेळी काँग्रेसच्या नेत्यांच्या वक्तव्यांकडे जनतेचं लक्ष वेधलं होतं, असं ते म्हणाले. नक्षली हल्ल्यात मृत्यू झालेले भाजप नेते भीमा मांडवी यांना मोदींनी श्रद्धाजली वाहिली. नक्षलवाद्यांचा प्रभाव कमी झालेल्या परिसरात हा हल्ला झाला आहे, हे दुर्दैवी आहे. हे हल्ले का झाले? असा सवाल उपस्थित करत मोदींनी काँग्रेसला जबाबदार धरले. आमचं सरकार आल्यानंतर देशद्रोहाचा कायदा रद्द करण्यात येईल, असं मोदींनी सांगितलं.

 

Related posts: