|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » पुस्तकनिर्मितीमध्ये अंतरंग आणि बहिरंग यांचा मिलाफ आवश्यक

पुस्तकनिर्मितीमध्ये अंतरंग आणि बहिरंग यांचा मिलाफ आवश्यक 

 

 पुणे / प्रतिनिधी  :  आशय हा पुस्तकाचा खरा आत्मा असतो आणि उत्कृष्ट पुस्तकनिर्मितीसाठी आशयपूर्ण अंतरंग आणि त्याला साजेसे बहिरंग यांचा मनोहर मिलाफ आवश्यक असतो. अशी पुस्तके खऱया अर्थाने महत्त्वाची ठरतात, असे मत अ. भा. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. राजेंद्र बनहट्टी यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने झालेल्या कै. पुष्पा पुसाळकर पुरस्कार प्रदान समारंभात ते बोलत होते. ‘ऐवजी’ या नंदा खरे लिखित ग्रंथाच्या उत्कृ÷ ग्रंथनिर्मितीबद्दल हा पुरस्कार मनोविकास प्रकाशनाचे आशिष पाटकर याना बनहट्टी यांच्या हस्ते देण्यात आला, यावेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार, प्रकाशक आशिष पाटकर, ग्रंथनिवड समितीचे सदस्य योगेश नांदुरकर उपस्थित होते.

सन्मानाला उत्तर देताना आशिष पाटकर म्हणाले, पुस्तक केवळ छापणं म्हणजे प्रकाशन नव्हे. विषय आणि लेखकाची निवड, लेखन, संपादन, छपाई, मुद्रितशोधन आणि सजावट या साऱया गोष्टींचा सुयोग्य संयोग प्रकाशक साधत असतो.