|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » भाजप-शिवसेना युतीचा पराभव करा

भाजप-शिवसेना युतीचा पराभव करा 

पुणे / प्रतिनिधी :

भारताचे संविधान, राष्ट्रीय एकात्मता आणि धर्मनिरपेक्ष लोकशाही वाचविण्यासाठी नरेंद्र मोदी आणि भाजपा सरकारला पराभूत करण्याची तसेच डाव्या आघाडीचे संसदेमधील प्रतिनिधीत्त्व वाढविण्याची गरज आहे. त्यासाठी सक्षम असणाऱया डाव्या पक्षाच्या उमेदवारांना तसेच धर्मनिरपेक्ष पक्ष आघाडीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने स्पष्ट भूमिका घेतली आहे. त्यानुसार आगामी निवडणुकीत पुणे जिल्ह्य़ात सर्व मतदार संघांमध्ये सक्षम असणाऱया काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा देण्यात येणार असल्याची माहिती राज्य समिती सदस्य अजित अभ्यंकर यांनी बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. याप्रसंगी पुणे जिल्हा समिती सचिव नाथा शिंगाडे, कॉ. वसंत पवार उपस्थित होते.