|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » ‘मराठी विज्ञान परिषदेतर्फे डॉ. बासर्गेकर यांचे व्याख्यान

‘मराठी विज्ञान परिषदेतर्फे डॉ. बासर्गेकर यांचे व्याख्यान 

पुणे / प्रतिनिधी :

मराठी विज्ञान परिषद पुणे विभागातर्फे ‘पॉलीमर्स व प्लास्टिक्स’ या विषयावर डॉ. राजीव बासर्गेकर यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. शुक्रवार, दि. 19 एप्रिल रोजी सायंकाळी 6.15 वा. नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात हे व्याख्यान होणार असून, ते सर्वांसाठी खुले असणार आहे.

पॉलीमर्सची निर्मिती आणि विघटन, ऊर्जेची कमतरता आणि वाढती किंमत, विल्हेवाटीचे विज्ञान आणि तंत्रज्ञान अशा विविध गोष्टींचा आढावा, डॉ. बासर्गेकर आपल्या व्याख्यानातून घेणार आहेत. तरी विज्ञानप्रेमी नागरिकांनी या व्याख्यानाचा लाभ घेण्याचे आवाहन विज्ञान परिषदेचे अध्यक्ष विनय यांनी केले आहे.