|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » क्रिडा » पंत, रायडू, सैनी पर्यायी खेळाडू

पंत, रायडू, सैनी पर्यायी खेळाडू 

 

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  फलंदाज ऋषभ पंत, अनुभवी फलंदाज अंबाती रायुडू आणि वेगवान गोलंदाज नवदीप सैनी हे तिघे वर्ल्डकपसाठी भारताचे पर्यायी खेळाडू असणार आहेत. गरज पडल्यास या खेळाडूंचा वर्ल्डकप संघात समावेश केला जाणार आहे.

आयसीसी चॅम्पयिन्स ट्रॉफीप्रमाणेच वर्ल्डकपसाठीही तीन पर्यायी खेळाडू राहतील. ऋषभ पंत आणि अंबाती रायुडू क्रमशः पहिला पर्याय तर सैनी हा दुसरा पर्याय असेल. सैनीला गोलंदाज म्हणून स्थान देण्यात आलं आहे, असे बीसीसीआयच्या एका वरि÷ अधिकाऱयाने सांगितले. खलील अहमद, आवेश खान आणि दीपक चहर हे नेटमधील गोलंदाज म्हणून संघासोबत जाणार आहेत, असेही या अधिकाऱयाने पुढे स्पष्ट केले. खलील, आवेश आणि दीपक हे पर्यायी खेळाडू नाहीत. गोलंदाज म्हणून त्यांना संघातही संधी मिळू शकते. फलंदाजीचा विचार केल्यास स्थितीनुसार ऋषभ आणि रायुडू यापैकी एकालाच संधी मिळू शकते, असेही या अधिकाऱयाने पुढे नमूद केले. सैनीसुद्धा संघासोबत इंग्लंडला जात आहे, असे हा अधिकारी म्हणाला.