|Sunday, September 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अपघातानंतर महामार्गावर ट्रकला आग

अपघातानंतर महामार्गावर ट्रकला आग 

प्रतिनिधी/ बेळगाव

पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील बर्डे धाब्याजवळ बुधवारी दुपारी अपघातानंतर ट्रक व मोटारसायकलने पेट घेतला. या अपघातात कडोली येथील तीन तरुण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. बुधवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमास ही घटना घडली आहे.

सुनील शिवाजी भोगणे (वय 26), विवेक कृष्णा बिर्जे (वय 16), रितेश परशराम पाटील (वय 20, तिघेही रा. कडोली) अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. रात्री वाहतूक उत्तर विभाग पोलीस स्थानकात अपघाताची नोंद झाली आहे.

कडोली येथील तीन तरुण मोटारसायकलवरून जात होते. त्यावेळी एमएच 12 केपी 7477 क्रमांकाचा ट्रक मोटारसायकलला घासून गेल्याने तीनही तरुण उडून पडले. या अपघातानंतर मोटारसायकल ट्रकच्या खाली सापडली. दोन्ही वाहनांत झालेल्या घर्षणामुळे ठिणगी पडून आग लागली.

तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. सुरुवातीला काकती पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक अर्जुन हंचिनमनी व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्मयात आणली.