|Monday, January 20, 2020
You are here: Home » Top News » भाजप आमदाराला मारलेल्या नक्षलवाद्यांचा खात्मा

भाजप आमदाराला मारलेल्या नक्षलवाद्यांचा खात्मा 

ऑनलाईन टीम / छत्तीसगड :

छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे भाजपा आमदाराच्या हत्येच्या कटात सामील असलेल्या दोन नक्षलवाद्यांचा चकमकीत खात्मा करण्यात आला. धनिकरका येथील जंगलात ही चकमक झाली आहे. दंतेवाडा येथील कुवाकोंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुरूवारी सकाळी सुरक्षा दलाच्या गस्ती पथकावर नक्षलवाद्यांनी गोळीबार केला. यानंतर सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर दिले. काही वेळाने नक्षली जंगलात पसार झाले. पोलिसांनी परिसरात शोधमोहीम राबवली असता दोन नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले. घटनास्थळावरुन पोलिसांनी शस्त्रसाठाही जप्त केला आहे.

छत्तीसगडमधील नक्षलविरोधी अभियानाचे महासंचालक गिरधारी नायक यांनी सांगितले, चकमकीत खात्मा झालेला नक्षली वर्गीस याच्यावर पाच लाख रुपयांचे इनाम होते आणि तो सुरुंगद्वारे स्फोट घडवण्यात तज्ञ होता. भाजपा आमदार भीमा मंडावी यांच्या हत्येच्या कटातही वर्गीस याचा सहभाग होता. या चकमकीत एक नक्षलवादी जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Related posts: